बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना सुद्धा या जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ जनावरांपैकी दोन जनावरांची बारामती शहर पोलिसांनी सुटका केली असून,ताब्यात घेण्यात आलेल्या आलेल्या जनावरांची व्यवस्था गोशाळेत करण्यात आली आहे.तर याप्रकरणी संशयित आरोपी ख्वाजा हुसेन कुरेशी,असिफ मुस्तफा कुरेशी,मैनू मुबारक कुरेशी,अजम बाबू कुरेशी सर्वजण रा.बारामती,जि.पुणे ) यांच्यासह अज्ञात १० ते १२ जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (d),महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ,५ (बी),(सी) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरक्षक हृषीकेश प्रभाकर देवकाते,वय.२७ वर्षे (रा.निरावागज,ता.बारामती जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी हृषीकेश देवकाते हे गेल्या काही वर्षपासून बारामतीमध्ये गोरक्षक म्हणून काम करीत असून,१४ जुलै रोजी सायंकाळी ५.१५ वाजता माहिती मिळाली की,बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काही कसायांनी कत्तलीच्या हेतूने जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली असता,फिर्यादींनी व त्यांच्या मित्रांनी त्याठिकाणी जात पाहणी केली,त्यावेळी कृषी बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या झाडांना १४ जनावरे बांधलेल्या अवस्थेत दिसून आली.त्यांना कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती.सर्व जनावरे भुकेलेली होते उपासमारीमुळे त्याचे पोट आत गेल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आल्याने,देवकाते यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली.या सर्व गोष्टींची कुणकुण कसायांना लागल्याने १५ ते २० कसायांनी बाजार समितीत जात सर्व जनावरे सोडुन पळ काढल्याने फिर्यादींनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली.
या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देवकाते यांनी आपल्या मोबाईल मध्ये केली.त्यामध्ये जनावरे पळवणाऱ्यांना फिर्यादी ओळखत असल्याने यातील संशयित आरोपी हुसेन कुरेशी,असिफ मुस्तफा कुरेशी,मैनु मुबारक कुरेशी,अजम बाबु कुरेशी यांच्यासह अज्ञात १० ते १२ लोक होते.काही वेळातच शहर पोलीस त्याठिकाणी पोहचले असता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर झाडाला दोन जरश्या गायी बांधलेल्या आढळुन आल्या. पोलीसांनी आजुबाजुला लोकांकडे विचारणा केली असता, त्या गायी कोणाच्या आहेत,याबाबत माहिती न मिळाल्याने पोलिसांनी दोनी गायी ताब्यात घेत,त्यांची मळद येथील दयोदय गोशाळेमध्ये जमा केल्या.
यामध्ये ४० हजार रुपये किंमतीच्या पांढऱ्या रंगाच्या दोन गायी,पळवुन नेलेल्या गायी अंदाजे १ लाख ६० हजार किंमतीच्या ८ जरश्या जातीच्या गायी,तसेच अंदाजे ४० हजार किंमतीच्या ताबड्या पांढ-या रंगाच्या ४ जरश्या जातीच्या गायी असा एकूण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून कत्तलीच्या उद्देशाने बांधून १४ गायी बाधुन ठेवल्या होत्या,व त्यातील १२ गायी कसायांनी पळवून नेल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहा.पोलीस निरीक्षक उमेश दंडीले,पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर,पोलीस कर्मचारी जाधव यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडीले हे करीत आहेत.