Pune News : पुण्यातील ७२.६८ कोटींच्या बनावट बिलांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडीट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या व्यापा-यास अटक केली आहे.वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विविध विश्लेषण प्रणाली च्या आधारे सखोल विश्लेषण करून सदर करचोरीचा शोध घेण्यात आला.

मे.शिव स्टील ट्रेडर्स या व्यापायाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती.वस्तू व सेवाकर विभागाकडून योगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत दौलत शिवलाल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. मा. न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी या व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे.

या मोहीमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २७ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.ही कारवाई पुण्याच्या राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर,राज्यकर उपायुक्त अन्वेषण सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.राज्यकर आयुक्त अन्वेषण हृषीकेश अहिवळे,चंदर कांबळे,प्रदीप कुलकर्णी,श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली.संपूर्ण कारवाई दरम्यान धनंजय आखाडे,अप्पर राज्यकर आयुक्त पुणे यांचे मार्गदर्शन मिळाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *