दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
औरंगजेबाच्या प्रेमाखातर आणि अब्दुल सत्तरच्या श्रद्धेसाठी औरंगजेबाच्या सत्ताधारी दोन पट्ट्यांनी संभाजीनगर आणि धाराशिव आणि मुंबईतील विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याच्या नामांतराचा निर्णय रद्द केला. सत्तेवर बसण्यासाठी आमदार फुटू नयेत आणि MIM सुद्धा खुश करता यावं यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या विश्वासाचा घात केला.
मागील सरकारने घेतलेले निर्णय विद्यमान सरकारने रद्द करावे हा त्यांचा राजकीय विषय असला तरी छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. एकदा जिल्ह्याला दिलेलं छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘संभाजीनगर’ नाव हे बदलायला यांना लाज कशी वाटली नाही.सत्ताधाऱ्यांनो,कर्मवीर भाऊराव पाटलांना आठवा. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं’ नाव त्यांच्या शाळेला दिलं होतं.
एक तथाकथित व्यक्ती त्यांना म्हणाला की माझ्या वडिलांचे नाव शाळेला द्या, त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले… वेळ पडली तर माझ्या बापाचं नाव बदलेल, मात्र शाळेला दिलेलं ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव’ कधीही बदलणार नाही. एवढा मोठा महान माणूस महाराष्ट्रातच होऊन गेला. मात्र पाताळयंत्री, कपाळ करंटे महाराष्ट्रातील सरकार संभाजी महाराज यांचे नाव बदलत हे दुर्दैवी आहे. शिवप्रेमी म्हणून संभाजीनगर नाव रद्द करण्याच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.