BIG BREAKING : बारामतीतील रियल डेअरी आणि तुपे दामत्यांच्या वर्तनाने अनेक शेतकऱ्यांसह डेअरी व्यवसायिकांचे प्रपंच उध्वस्त होतील – सोनाली जांबले


फसवणूक झाली असली तरी कायदेशीर मार्गाने लढत राहू सत्य लपत नसते समोर येईल…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती येथील रियल डेअरी चे सर्वेसर्वा मनोज तुपे व पत्नी अनिता तुपे यांच्या वर्तनाने अनेकांचे संसार उध्वस्त होतील अशी माहिती माध्यमांशी बोलताना शांताई डेअरीच्या संचालक सोनाली जांबले यांनी सांगितले. रिअल डेअरी आणि तुपे यांनी आमच्या बाबतीत ६६ लाख ९३ हजार ५६० रुपयांची फसवणुक केली आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.रियल डेअरी आणि तुपे कुटुंबीय यांनी यापूर्वीही अनेक डेअरी व्यवसायिकांवर खोटे गुन्हे दाखल करून कोट्यावधी रुपयांची डेरी व्यवसायिकांची उद्योजकांची फसवणूक केल्याची समाजात चर्चा आहे.

शुद्ध व संकलित दुधात स्वतःच काहीतरी गोड बंगाल करायचे व अन्य डेअरी व्यवसायिकांच्या नावावर त्याचे खापर फोडून त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये लटकवायचे व उर्वरित रक्कमेला कायमचं आळे मारायचं असं कृत्य करायचं काम तुपे हे रियल डेअरीच्या माध्यमातून करीत आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसह डेरी व्यवसायिकांचे प्रपंच उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.याबाबत पोलीस प्रशासनाने देखील सविस्तर चौकशी करण्याची गरज असल्याचे मत सोनाली जांबले यांनी व्यक्त केले.भारत हा कृषी प्रधान देश असून येथील अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी आहे मात्र शेतकऱ्यांची अशी जर फसवणूक होणार असेल तर कायद्याने याला जरब बसणे गरजेचे आहे अशा फसवणुकी करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.

पोलीसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे असेही यावेळी सोनाली जांबले यांनी सांगितले.तसेच रिअल डेअरीचे सर्वेसर्वा मनोज तुपे हे राजकीय वजन असल्याचे दाखवून देत अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असतात,यामुळे आता रिअल डेअरी व मनोज तुपे यांच्या मालकीच्या असलेल्या डेऱ्यांनी ज्या ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहेत,त्या गुन्ह्याची स्वतंत्र तपास अधिकारी नेमून चौकशी करावीत म्हणजे तपासात जे काही असेल ते समोर येईल.आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि दूध व्यवसायिकांना न्याय मिळेल.असे मत देखील सोनाली जांबळे यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

बातमी चौकट :

यामुळे आता पुणे ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना व डेअरी धारकांना न्याय मिळवून देणार का ? अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *