पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्यात खरीपाच्या सरासरी १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आजअखेर ७३ हजार ८०८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून पेरणीचे प्रमाण सरासरीच्या ३७ टक्के आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
खरीप पेरणीसाठी आवश्यक बियाणे योग्य प्रमाणात उपलब्ध असून बाजरीचे सुमारे २ हजार ६०० क्विंटल, मका- २ हजार ४००, भात- २२ हजार, तूर- १३०, वाटाणा- ६००, भुईमूग- ४५० क्विंटल तर सोयाबीनचे ३ हजार ६०० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
तालुकानिहाय झालेली पेरणी व कंसात सरासरी पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे:
हवेली- ८२१ हे. (४ हजार ९०६ हे.), मुळशी- ४१४ (८ हजार ५४५), भोर- ४ हजार ९६५ (१७ हजार ४६५), मावळ- ५३४ (१२ हजार ९९०), वेल्हे- ३८१ (५ हजार ८९२), जुन्नर- ११ हजार ९३१ (२९ हजार ७७७), खेड- १५ हजार ९२१ (२३ हजार ३९९), आंबेगाव- ७ हजार ६०६ (१६ हजार १४), शिरुर- १२ हजार २३६ (३३ हजार ७००), बारामती- ८ हजार २७४ (११ हजार १), इंदापूर- ३ हजार ८३६ (८ हजार ४१४), दौण्ड- १ हजार ९३५ (४ हजार ३८८), पुरंदर- ४ हजार ९५१ हे. (१९ हजार २१९ हे.) याप्रमाणे पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सुमारे ६९ हजार मे. टन खते उपलब्ध असून त्यामध्ये युरिया २५ हजार ९०० मे. टन., डी.ए.पी.- ५ हजार ८०० मे. टन, एम.ओ.पी.- १ हजार ९०० मे. टन, एस.एस.पी.- ९ हजार ७०० मे. टन, तर विविध संयुक्त खते सुमारे २५ हजार ७०० मे. टन उपलब्ध आहेत.
जिल्ह्याच्या ८३० मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत ३९४ मि.मी. (४७ टक्के) पाऊस झाला आहे, अशी माहितीदेखील कृषी विभागाने दिली आहे.