Baramati Crime : बारामती शहर पोलीसांनी सराईताकडून १ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस केली हस्तगत..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या विरोधात विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते,त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना एकाला गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,
सलमान अबू थोटे,वय.२६ वर्षे (रा.घर न ५,पाचवण, निजामपुरा भिवंडी,ठाणे) हल्ली (रा.फुरसुंगी,पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,शहर स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना,शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना बारामती रेल्वे स्टेशनजवळ एकजण गावठी पिस्टल घेवून थांबला असल्याची माहिती मिळाली असता,त्यांनी ही बाब तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना सांगितली असता,त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी व अंमलदार यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून,त्याच अंगझडती घेतली असता,त्याच्या कंबरेस अंदाजे २५ हजार किमंतीचे पिस्टल मिळून आले. व डाव्या खिश्यात २०० रुपये किंमतीची दोन जिवंत
काडतुसे असा एकुण २५,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर घरफोडी व चोरी असे गंभीर प्रकारचे गुन्हे भिवंडी येथे दाखल आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ,पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस अंमलदार अनिल सातपुते, रामचन्द्र शिंदे, गौरव ठोंबरे,अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण, बंडू कोठे,दशरथ इंगोले यांचे पथकाने केली.

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *