BIG BREAKING : दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेने घेतले ताब्यात ; सहा जणांवर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर दोनजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई सोमवारी (दि.११ ) खडकी अॅम्युनिशन फॅक्टरी कडून विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या टँक रोडवर केली.याप्रकरणी संशयित आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९९,४०२,भारताचा हत्यार कायदा पोलीस महाराष्ट्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय विक्रम आरडे,वय.१९ वर्षे (रा.आळंदी रोड,भोसरी मुळ रा.घाटावडे,जि.बीड),अंत्रोस गोंदेलाल पवार,वय.४० वर्षे (रा. बेडाऊ,ता.छन्नेरा,जि.खंडवा,मध्य प्रदेश ) सध्या (रा.पुणे फिरस्ता ) आकीलाल साकीलाल पारधी, वय.२५ वर्षे,(रा.ग्राम कुडो,ता. रिठी,जि.कटनी, मध्यप्रदेश), बियरलाल मनीबेज राजपुत,वय.२५ वर्षे (रा.ग्राम कोहडे, ता.रिठी, जि.कटनी,मध्यप्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तर अतुल चव्हाण व सुरज हे फरार झाले आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी कर्मचारी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अॅम्युनिशन फॅक्ट्रीकडून विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या टँक रोडवर एक रिक्षा संशयित रित्या उभी असल्याचे आढळून आले.पोलिसांनी रिक्षा आणि त्यामधील व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली. रिक्षाची झडती घेतली असता हत्यारे, कटावनी, कटर,नायलॉन दोरी ही घरफोडीची सामान आढळून आले.आरोपी हे मुळचे मध्यप्रदेशातील कटनी येथील आहेत. त्यांनी पुणे शहर आणि परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर,पोलीस सहायक निरीक्षक विकास जाधव पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख,नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचीम,प्रवीण कराळे, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, विनोद महाजन,कौस्तुभ जाधव, सारस साळवी,रमेश राठोड, अशोक शेलार,वैशाली माकडी, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *