BIG BREAKING : मुद्दलेच्या तिप्पट पैसे देऊनही जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकाराला पोलिसांनी घेतले ताब्यात..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

एक लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल ३ लाख १४ हजार रुपये फेडले असतानाही २ दुचाकी गहाण ठेवून घेऊन जीवे मारण्याची धमकी देत आणखी ७० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८६, ३८७, ४५२, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम चे कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप दत्तात्रय भगत,वय.३६ वर्षे (रा.जयभवानी नगर,पौड रोड, कोथरुड ) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद शिवराम परब वय.५० वर्षे (रा.जय भवानीनगर,पौड रोड, कोथरुड ) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रसाद परब हे इलेक्ट्रीशियन आहेत.त्यांनी गरजेपोटी सप्टेबर २०१९ मध्ये संदीप भगत याच्याकडून १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते.त्याने एक महिन्याचे १० टक्क्याने १० हजार रुपये व्याज कपात करुन ९० हजार रुपये
फिर्यादीस दिले.त्यापोटी फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज असे मिळून ३ लाख १० हजार रुपये व ४ हजार रुपये दंड असे ३ लाख १४ हजार रुपये दिले. असे असतानाही भगत याने फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या दोन दुचाकी फिर्यादी यांच्याकडून धमकावून जबरदस्तीने त्याच्याकडे ठेवून घेतल्या. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे आणखी ७० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.पोलिसांनी खासगी सावकाराला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *