Baramati News : बारामती तालुक्यातील पारवडी येथील घटना ; मेंढपाळाच्या मुलीला दगडाने मारहाण करणाऱ्या तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील पारवडी येथे मेंढपाळ मेंढ्या चारत असताना इकडे तू मेंढ्या का चारतो अशी विचारणा करीत मेंढपाळाच्या चार वर्षाच्या मुलीला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,बारामती तालुका पोलिसांनी संशयित आरोपी राजू अर्जुन कोकणे,अर्जुन कोकणे (पूर्ण नाव माहीत नाही),अर्जुन कोकणे याचा भाचा तिघेही (रा.पारवडी,ता.बारामती, जि.पुणे) यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२६,३२३,५०४ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नामदेव आण्णा गडदरे, वय.३५ वर्षे (रा.रिसे पिसे,ता.पुरंदर,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

तालुका पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे १० जुलै २०२२ रोजी सायकांळी ६.०० वाजताच्या सुमारास शिर्सुफळ गावाच्या हददीतून पारवडी गावच्या हददीत मेंढया चारण्यास घेवून असताना तेथे असलेल्या संशयीत आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत हे माळरान आमच्या मालकीचे असून मेढंया तात्काळ बाहेर काढण्यास सांगितल्या. आम्ही सर्व मेंढपाळ मेंढया त्यांचे माळरानातून बाहेर काढत असतानाच संशयित आरोपींनी तेथे पडलेला दगड उचलून मारला,तो दगड आप्पा कोकरे यांच्या उजव्या खांदयावर लागल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच तेथे एकजण येत त्याने देखील फिर्यादींना व इतरांना
शिवीगाळ करत तेथेच पडलेले दगड फेकून मारू लागला.

त्यातील एक दगड फिर्यादींची चार वर्षाची मुलगी काजल हिच्या डोक्यात लागून ती बेशुद्ध पडली.त्यांनतर फिर्यादीसोबत असलेल्या इतर मेंढपाळांनी मारहाण करणाऱ्यांना बाजूला घेवून गेले.काजल हिच्या डोक्यात फ्रक्चर होवून रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी तिला पुणे येथे घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यांनतर आंम्ही काजल हिला के.ई.एम हास्पीटल,पुणे येथे उपचारकामी घेवून गेलो.सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तालुका पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना तात्काळ अटक केली.या गुन्ह्याचा अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.

बातमी चौकट :

मेंढपाळांच्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनविभागाच्या कर्मचारीही मेंढपाळांना त्रास देत आहेत. मेंढ्या उचलून नेणे खोटे गुन्हे दाखल करून विनाकारण त्रास देणे आदी अनेक प्रकार घडत आहेत.दोन दिवसांत ही दुसरी घटना आहे.त्यामुळे मेंढपाळांच्या प्रश्नांवर शासन पातळीवर ठोस निर्णय झाला पाहिजे. लवकरच या संदर्भात गृहमंत्रालयाने दखल घेतली पाहिजे,असे यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर,यांनी सांगितले.इंग्रजांच्या काळापासून शेळ्या मेंढ्यासाठी ४० टक्के चराऊ कुरणे राखीव आहेत. परंतु वनविभागाने तिथे चराई क्षेत्र असा बोर्ड लावण्यात यावा.यामुळे हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, मारहाणीच्या घटना,मेंढ्या जबरदस्तीने पळवून नेणे,महिलांना,मुलांना मारहाण करणे असे अनेक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, राज्य सरकारने मेंढपाळांचे संरक्षण करणे गरजेचे आहे व त्यासाठी कायदा करावा.म्हणजे हल्ला करण्याचे धाडस होणार नाही असे यावेळी सोलनकर यांनी सांगितले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *