बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती एमआयडीसी परिसरातील रियल डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दूध कंपनीची कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संगणमत करून कमी क्वालिटीचे दुध असताना देखील चांगली क्वालिटी असल्याचे भासवत बनावट रेकॉर्ड तयार करून तब्बल ८६ लाख ९३ हजार ८३७ रुपये रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संशयित आरोपी राहुल संभाजी शेडगे(गाव माहीत नाही ),अभिजित बाळू कदम (गाव माहीत नाही ),हनुमंत म्हस्कु जांबले (रा.वासुंदे,ता.दौंड, जि.पुणे) दिपक शिंदे (गाव माहीत नाही ) यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १०९,१२०(ब), ४०८,४२०,४७७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रियल डेअरी कंपनीचे मालक मनोज कुंडलिक तुपे, वय.४७ वर्षे (रा.रो हाऊस नं.५,ग्रीन पार्क विद्यानगरी, एमआयडी,बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिलेली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी मनोज तुपे हे १५ वर्षापासून केमिस्ट म्हणून काम करत असल्याने,त्यांना दूध क्षेत्रातील अनुभव आल्याने त्यांनी सन २०१४ साली बारामती एमआयडीसी परिसरात रियल डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाने दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्याची कंपनी सुरू केली असून या कंपनीमध्ये मिल्क कलेक्शन शिवाय सात मिल्क सप्लायर्स कडून त्यांची कंपनी दूध विकत घेते व हे दूध घेण्यापूर्वी दुधाची क्वालिटी चेक केली जाते.व त्यानंतरच त्यापासून दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात.फेब्रुवारी २०२२ संशयित आरोपी शांताई मिल्क अँड मिल्क प्रोड्युक्टचे मालक हे फिर्यादीना भेटले व त्यांनी त्यांचे दूध रियल डेअरीला देण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावेळी फिर्यादींनी त्यांना दुधाच्या क्वालिटीनुसार दर देण्याचे सांगितल्याने २५ फेब्रुवारी २०२२ पासून रियल डेअरी कंपनीकडे MH 16 AY 9955 व MH 42 B 9925 या दोन टँकर मधून दूध सप्लाय करण्याची सुरुवात केली.त्यावेळी रियल डेअरीचा रिकव्हरी रेट ९९ २४ होता.मार्च २०२२ पासून रियल डेअरीचा रिकव्हरी रेट ढासळल्याने,फिर्यादींनी कंपनीत मिटिंग घेतली असता,जांबले यांच्यापासून दूध घेण्यास सुरुवात केल्यापासून रिकव्हरी रेट कमी झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले.
कारण इतर सप्लायरचे टँकर रिजेक्ट झालेले होते,परंतु जांबले यांचा एकही टँकर रिजेक्ट झालेला नसून,त्यांचे टँकर हे नेहमी रात्रीच्या वेळीस आल्याने फिर्यादींचा संशय बळावल्याने १३ जून २०२२ रोजी आरोपीचे टॅंकर चेक केल्याने नेहमीपेक्षा एका टँकरमध्ये २००० लिटर व दुसऱ्या टॅंकरमध्ये ३००० लिटर दुध कमी आल्याचे फिर्यादींना दिसून आले.त्यावेळी आरोपीसोबत कंपनीतील कर्मचारी असल्याने, मॅनेजमेंटची टीम दूध क्वालिटी चेक करणार असल्याची माहिती दिल्याने आरोपीने १३ जून २०२२ ला कोणतीही भेसळ न दूध दिल्याने १४ जून २०२२ आरोपीचे टँकर बंद केले.यामुळे जमले यांच्या टँकर मधून कमी क्वालिटीचे दूध येत असताना देखील कंपनीतील काही केमिस्ट कडून त्याची कॉलिटी वाढवून दाखवली जात होती, हे निदर्शनास आले असता कंपनीतील राहुल शेडगे व अभिजीत कदम यांच्या ड्युटीच्या कालावधीत जमले यांचे टँकर आल्याचे दिसून आले.
आणि यात जमले देखील सामील असल्याचे दिसून आले.फिर्यादींनी जांबले यांना २५ फेब्रुवारी २०२२ पासून दुधाचे तब्बल ७ कोटी २० हजार ५३२ पेमेंट दिलेले असुन,जांबले यांनी कमी दर्जाचे दूध दिल्याने कंपनीची रिकव्हरी ढासळल्याने त्यात अंदाजे २ लाख ३६ हजार ५६७ लिटर दुधाची भेसळ प्राप्त झाल्याने रिअल डेअरी कंपनीची जवळपास ८६ लाख ९३ हजार ८३७ रुपयांचे नुकसान झाल्याने, फिर्यादींनी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जांबले व टँकरवरील ड्रायव्हर यांच्या सांगण्यावरून कमी क्वालिटीचे दूध असताना,त्याची चांगली क्वालिटी असल्याचे बनावट रेकॉर्ड तयार करून रियल डेअरी कंपनीचे तब्बल ८६ लाख ९३ हजारांचे नुकसान केल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत म्हंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.