BIG BREAKING : शिवसेनेच्या या आमदाराविरोधात गाड्यांचे नुकसान केल्याचा आरोप ; क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

कार्यालयाबाहेर दुचाकी उभी केली म्हणून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी काही तरुणांना शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणांच्या वाहनांचे नुकसान केल्याचंही तक्रारीत म्हटलं गेलं आहे. कार्यालयासमोर दुचाकी उभी केली म्हणून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिवीगाळ करत गाड्यांचे नुकसान केल्याचा आरोप करीत एका तरुणाने क्रांतिचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

कुशल विजय चावरीय (वय २०) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारीत असे म्हटले आहे की, रविवारी १० जुलै रोजी रात्री अमित चावरीया, अतुल चावरिया, अनिकेत जावळे, रोहित हिवराळे, आदित्य गायकवाड इत्यादी मित्र शिवसेना आमदार आंबदास दानवे यांच्या अजबनगर येथील संपर्क कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेलवर चहा पित होते. या तरुणांनी त्यांची दुचाकी कार्यालयासमोर लावली होती.

आमदार दानवे यांचे वाहन येणार असल्याने त्यांना दुचाकी काढून घ्या, असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, सर्व तरुण हॉटेलबाहेर आले असता त्यांची वाहने खाली पाडण्यात आली होती. अंबादास दानवे यांच्या पी.ए. आणि इतर कार्यकर्त्यांनी गाड्यांचे नुकसान केले. तर अंबादास दानवे यांनी तरुणांना शिवीगाळ केली, अशी तक्रार क्रांतिचौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *