पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंती अशोक उमरगेकर यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.प्रियंका अभिषेक उमरगेकर,वय.२२ असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित सुनेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रियंका आणि अभिषेक यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या घरातील हा विवाह असल्याने त्याला अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या.
प्रियंका उमरगेकर यांनी मरकळ रोडवर असलेल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.ही बाब शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी
पोलिसांना कळविली.पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविला. नगरसेविका कमल अनिल घोलप यांची कन्या होती.प्रियंका हिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.