आळंदी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आजि सोनियाचा दिनू बरसे अमृताचा धनू. याचि प्रचिती आज तमाम भाविकभक्तांच्या मुखावरुन दिसून येते. आषाढ एकादशी पहाटेच चंद्रभागेच पवित्र स्नान.
जेव्हा नव्हते चराचर/ तेव्हा होते पंढरपूर//
जेव्हा नव्हती गंगा/ तेव्हा होती चंद्रभागा//
भक्त पुंडलिकाच्या मातापित्या सेवेशी प्रकट पंढरीधिश. चंद्रभागा स्नान , गंगार्पण तर्पण , गोधन चारा , वासुदेव दान , पानफुल करी दाम . वाहत्या चंद्रभागेतिरी मातापिता सेवक भक्त पुंडलिक दर्शन , महाद्वारी दिव्यांग मदत , नामदेव पायरी नतमस्तक , कळस दर्शन , प्रदिक्षणा , लोटांगण.
गोपाळपूरापासून वारीतून बारीत उभे राहणे. खिचडीचा आस्वाद , २४ तासाहून अधिक कालावधीचा अवधी , गरुड खांबाचे अलिगंण , गाभा-यातील…
सुंदर ते ध्यान / उभे विटेवरी//
देहभान हरपून आपण विटेवरी उभे राजस सुकुमार दर्शनी वारी कृत्य कृत्य होते. कपाळी बुक्का , माथा विठूरायाची चरणी समाधानी . माता रूक्मिणी सृजनतेच दर्शन . प्रसाद खरेदी. घराचे वेध ,
पाऊसाचे दमदार आगमन. जड अंतकरणाने माघारा जातो पंढरीनाथा.
बोला पुंडलिक वरादे हरी विठ्ठल..
आपलाच वारकरी प्रा. रवींद्र कोकरे.
९४ २१ २१ ६८ २१