पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून राजकारण विरहित बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.डॉ.श्रीकांत शिंदे,कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे व राजाभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर या पालखीमार्गावर नियमित वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येत होती.
यामध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी मा राजभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण सुर्वे यांच्याकडे पुणे जिल्हा समन्वकाची जबाबदारी देण्यात आली होती त्याचप्रमाणे अजय सपकाळ आणि जितू होते यांच्याकडे पुणे शहर व नजीकच्या मुक्कामाची जबाबरी देण्यात आली होती.यामध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमने आणि डॉक्टारांनी मिळून हे सेवा देण्यास मोलाचे सहकार्य केले या सेवेमध्ये ६० ते ७० पदाधिकारी कार्यकर्ते आरोग्यसेवकांनी सहभाग नोंदविला होता.अंदाजे लाखो वारकर्यांना प्राथमिक स्वरूपात औषधे आणि गोळ्या यांचे वाटप मोफत करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हि आरोग्यवारी २०२२ व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले यामुळे हे शक्य झाले अशी भावना वैद्यकाय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली व सर्वच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या पदाधीकारी व आरोग्यसेवकाचे आभार यावेळी मानले व पुढील वर्षी आणखी जोमाने काम करू असा विश्वास दिला.तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सतीश गावडे, कल्पनाताई काटकर,सारिका आटोळे,सागर आवटे,सोमनाथ लांडगे, कुणाल कांदे,भाग्यश्री जाधव,अरविंद दाभोळकर मनीषा परांडे,रणजित गायकवाड मोहोळचे समन्वयक सुरज जम्मा,डॉ.अमोल खानावरे,डॉ.उत्कर्षा चितळे,दिनेश घाडगे,विशाल धुमाळ,राहुल ढवळे,सुरज पुजारी,सुरेश दोरी,शुभम सपकाळ,शिवाजी शिंदे,सागर बनसोडे, नवनाथ सुतार,सचिन चौधरी,सोमनाथ लांडगे, व ऍम्ब्युलन्सचे सारथी प्रविण भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.