बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हबच्या माध्यमातून दुर्मिळ देशी वृक्षांची तीन टप्यात सुमारे ८०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.या झाडांचे संगोपन उत्तम रित्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला झाडांचं महत्व अत्यंत साध्या पद्धतीने सांगितले आहे.
गेली ४०० ते ३५० वर्ष या सर्व संत परंपरेने आपल्या समाजात विविध प्रकारे लोकांच्यात जनजागृती केली व वृक्षाच महत्त्व लोकांना सांगितलं आहे.आज पण अशाच सामाजिक जनजागृतीची गरज ओळखून ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब या संस्थेने तीन टप्यात सुमारे 800 दुर्मिळ देशी झाडांची लागवड केली आहे .
कण्हेरी फॉरेस्टच्या भागात शेंदरी, शिरीष, करवंद, कदंब, वड बदाम, मोहगुण आणि काटीसवाळ अशा वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष या ठिकाणी ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब या संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आले . हि संकल्पना ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हबच्या क्युरेटर देवयानी पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.
या कार्यक्रमासाठी बारामती वन विभागाच्या वनाधिकारी शुभांगी लोणकर,वन अधिकारी गोलांडे सर,मधुकर आगलावे व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच अविनाश लगड व वसुंधरा ऍग्रो ट्रेडर्स यांचं सहकार्य लाभले.बारामती हबचे सर्व शेपर्स स्नेहा साळुंखे,फातिमा खायमखणी, शंतनू जगताप,शुभम ओसवाल,माऊली खाडे,भारवी मूलमुले,खाडिजा खायमखणी,अनुराधा जरे,अक्षय घोलप रवी कांबळे,संकेत भोसले,ओंकार कोकरे,हतीम बारामतीवाला व अखिल सुर्यवंशी यांनी यशस्वीरित्या हि वृक्ष लागवडीची मोहीम पार पाडली