Daund News : पाटस येथे ऊस पिक परिसंवाद व सुपरकेन नर्सरी बाबत शिवारफेरीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( निलेश जांबले )

दौंड तालुक्यातील पाटस येथे कृषि विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कल्चर्ड क्रॉप फॉर्म समूह आणि नेटाफेम इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवाद व शिवारफेरीचे आयोजिन करण्यात आले होते.डॉ.जमगदनी सर यांनी सुपरकेन नर्सरी कशा पद्धतीने करावी याबाबत अत्यंत उत्तम मार्गदर्शन केले. ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार यांनी ऊसाचा विविध जातीविषयी मार्गदर्शन केले.डॉ.बोखारे यांनी खते व्यवस्थापन तर अरुण देशमुख यांनी ऊस पिकातील ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण भागवत, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप घोले, माऊली कापसे, राजेश थोरात, बाळासाहेब थोरात, उत्तम ताकवले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सुपरकेन नर्सरी बाबतचा छोटासा व्हिडिओ शौर्य घोले यांनी तयार केल्याबद्दल त्याचा कार्यक्रम प्रसंगी सन्मान करण्यात आला तसेच सोलापूरचे शेतकरी शिवाजी देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी तर सूत्रसंचालन रितेश पोपळघट व आभार माऊली कापसे यांनी मानले.या कार्यक्रम प्रसंगी सुपरकेन नर्सरीचे जनक डॉ.बाळकृष्ण जमदग्नी, ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, शुगर टेक्नॉलॉजीस्ट डॉ. मच्छिंद्र बोकारे, नेटाफेम इरिगेशनचे डॉ. अरुण देशमुख यांनी ऊस पिकाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *