पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी,सहायक अधीक्षक यांना १२ हजार रुपये लाच घेताना पुणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.जिल्हा रुग्णालय औंध येथील प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधव बापूराव कनकवळे सहा.अधीक्षक संजय सिताराम कडाळे असे लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.याप्रकरणी २५ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदार यांचे शिक्रापूर येथे सोनोग्राफी सेंटर आहे. या सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी सहायक अधीक्षक संजय कडाळे यांनी प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव कनकवळे यांच्यासाठी ४० हजार रुपये लाच मागितली.तडजोडीमध्ये १२ हजार रुपये देण्याचे ठरले होते.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची पंचासमक्ष बुधवारी (दि.६) पडताळणी केली.पडताळणीमध्ये डॉ.माधव कणकवळे, महादेव गिरी यांनी संगनमत करुन संजय कडाळे याच्यामार्फत ४० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून १२ हजार रुपये लाच घेताना संजय कडाळे याला पुणे एसीबीने रंगेहात पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा अडनाईक पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर,पोलीस हवालदार नवनाथ वाळके, अंकुश माने,चालक पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.