Palakhi Sohla News : आज ८ जुलै सात्त्विक वाणीची वैखरी मंजे वाखरी..!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

महाराष्ट्रातील सकलादि संत पालखी सोहळे , दिंड्या , वैष्णव , वारकरी , टाळकरी , माळकरी , फडकरी , कीर्तनकार , प्रवचनकार , भारुडकार , गायक ,वादक , मृदंगाचार्य , विणेकरी , पताकाधारी , तुळशीवृंदक , कलशधारी , विठ्ठल रूक्मिणी सेवक , भालदार , चोपदार , अश्वरुढ माऊली , मानाची बैलजोडी , सेवक , मानकरी , प्रशासन , पोलिस सेवेकरी , आरोग्यदूत , निर्मलवारी प्रचारक , प्रसाद , खेळणी , अमृततुल्यवाले , पानफुल सेवक , वाहक, चालक , अन्नदाते , चालते , बोलते , श्रेष्ठ , ज्येष्ठ , नरनारी , दिव्यांग , महातारे , लेकरुवाळी , हवशे , नवशे , गवशे सर्व एकाच ठिकाणी येतात. तवा नभातून वर्षा वर्षाव होत असतो.

बाजीरावाची विहीर येथे दुसरे उभे रिंगण अन् चौथे भव्य दिव्य मनमोहक चित्तहर्ष गोल रिंगण पाहून प्रत्येक जीव शिवाचा होऊन जातो.

वाखरीत जनसागराचे पेवच दिसून येते. समीप पंढरी . आनंदाचे डोही आनंद तरंग . सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आस. भेटी लागे जीवा. जीवाची तगमग शिवा भेटीस आतुर. ज्ञाना तुकाचा गजर धावते स्वागता पांडुरंग हजर .

आपलाच वैखरीदूत प्रा.रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *