महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
सावळ्या विठूरायाची पंढरी समीप , अवघा वैष्णव जनमय ,भाविक भक्तांचा जनसागर , टिपेला पोहचलेला हरिगजर , भगव्या पताका , नानाविध दिंड्या याने सोहळा अविस्मरणीय होऊन जातो.
वेळापूरचा आनंदसोहळा आटोपून ठाकूरबुवांची समाधी दर्शने वारकरी समाधानी होऊन जातात. येथे विराजमन होताच तिसरे गोल रिंगण सोहळा हा वैष्णवांचा श्वासोश्वासच असतो.
सृजन व कलाविष्कारांचा मेळा तोंडले -बोंडले येथे दिसून येतो. भरलेले आकाश , हिरवेगार शिवार , जोडीला चैतन्यमय ज्ञानियांचा राजा. येथे मनोरंजनातून प्रबोधन करणारी लोककला , भारुडे , गवळणी , हम्मा , फुगडी यातून हसून हसून डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य सुरु असते.
बंधू भेट सोहळा वारकरी साधनेच्या तपाचे जणू फलितच. टप्पा येथे ज्ञानराज व बंधू संत सोपनादेव भेटीचा अनुपम्य सोहळा भागवत धर्माची पताका उंचावताना दिसून येतो. वाडी कुरोलीचे ह्दयपूर्वक स्वागत करुन भंडीशेगाव मुक्कामाला माऊली विराजमन….जय जय राम कृष्ण हरि माऊली.
आपलाच माऊलीमय प्रा.रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१