इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलीसांना अपघातग्रस्त चारचाकी गाडीत तब्बल २८ किलो ५०० ग्रॅम गांजा मिळून आल्याने इंदापूर पोलिसांनी अज्ञात चालकावर व मालकावर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम २७९,४२७, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० (b) ,८ (c) ,महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यात गांजाच्या साडे तीन लाखांसह तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नितीन शिवाजी तांबे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पेट्रोलिंग करीत असताना,पोलिसांना माहिती मिळाली की,पायल सर्कल जवळ चारचाकी कारचा अपघात झाला असुन,या गाडीला कोणत्या तरी अज्ञात वाहानास पाठीमागुन धडक दिली असल्याने गाडीचा चालक व मालक गाडी सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी जावुन घटनास्थळाला भेट दिली असता त्याठिकाणी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्र. RJ.06.CE9228 मिळून आली. पोलिसांनी या अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता गाडीच्या पाठीमागील डिकी मधुन उग्रवास येत असल्याचे निदर्शनास आले. कारची डिकी उघडून पाहीली असता त्यामध्ये गांज्या भरून ठेवलेल्या पिशव्या दिसून आल्या. या गाडीत तब्बल २८ किलो ५०० ग्रॅम अंदाजे ६ लाख किंमतीचा व एक टोयटा कंपनीची गाडी अंदाजे किंमत १२ लाखांची गाडी असा तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक तयुब मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,ज्ञानेश्वर धनवे,महेश माने,पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे,सहा. फौजदार ताबे,कदम,पोलीस नाईक चौधर मोहिते,खान,मड्डी पोलीस कर्मचारी शिंगाडे,विशाल चौधर राखुडे यांनी केलेली आहे.