Pune Crime : बनावट तारण कर्ज घेऊन बँकेला लावला ६५ लाखांचा चुना लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

मालमत्ता तारण कर्ज घेताना मध्यस्थामार्फत केलेल्या कर्जप्रकरणात बनावट कागदपत्रे आढळून आल्यानंतर त्या मध्यस्थामार्फत केलेल्या कर्ज प्रकरणाची तपासणी साऊथ इंडियन बँकेने केली.तेव्हा एक नाही दोन नाही तर तब्बल ३ प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल करुन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साऊथ इंडियन बँकेच्या वाकड शाखा अधिकारी सौम्या नायर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरुन पोलिसांनी स्वप्नील मधुकर भुमकर (रा.भुमकर वस्ती,हिंजवडी) आणि प्रविण शिंदे (रा.रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वप्नील भुमकर यांनी फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांच्या मालकीच्या फ्लॅटवर मिळकत तारण कर्ज ६५ लाख रुपयांची मागणी केली होती.कर्ज सल्लागार प्रविण शिंदे यांच्या मार्फत त्यांनी अर्ज केला होता.त्यासाठी त्यांनी आयकर रिटर्न सादर केले होते.त्यानुसार त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन बँकेने त्यांना ६५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेचे शाखा अधिकारी अमिताभ कुमार हे बँकेतील दुसरे गृहकर्जदार विष्णु घुगे यांच्या मालमत्तेचा शोध घेत होते.त्यावेळी त्यांना घुगे यांनी ज्यामिळकतीवर कर्ज घेतले होते.ती मिळकत दुसऱ्याच्या नावावर आढळून आली.त्याने बँकेत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले.

त्यावेळी त्यांनी ही कागदपत्रेकोणामार्फत सादर झाली हे तपासले असता ती कागदपत्रे प्रविण शिंदे याच्यामार्फत सादर करण्यात आल्याचे दिसून आले.त्यानंतर प्रविण शिंदे यांच्या मार्फत जमा केलेली कर्ज प्रकरणे पडताळून पाहिले असताना त्यामध्ये स्वप्नील भुमकर यांचे आयकर रिटर्न चुकीचे असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्याचे अॅक्सीस बँकेचे बचत खाते स्टेटमेंट बनावट असल्याचे दिसले.बँकेकडे प्रवीण शिंदे याने कर्ज प्रकरण दाखल केलेला कर्जदार नंदकुमार रामचंद्र निंबाळकर यांचे कर्ज प्रकरणात सुद्धा बनावट कागदपत्रे मिळून आली होती.

यांचे कर्ज प्रकरणात सुद्धा बनावट कागदपत्रे मिळून आली होती.स्वप्नील भुमकर याने निंबाळकर यांचे आदित्य अग्रो प्रोसेस्ड फुड इंडस्ट्रीजचे चालू खात्यात २ लाख ४२ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केलेले दिसून आले.स्वप्नील भुमकर याचे कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून आल्याने बँकेने नियमानुसार भुमकर यांची मिळकत एनपीए करुन त्यावर प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.वाकड पोलीस ठाण्यात ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *