महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान जिथं होते ते वेळापूर. वेळ न दवडता भगवंत चरणी लीन , दीन होऊन विनवणी , तारुण्यातच वारी करावी. माळशिरस मुक्काम आटोपून माऊली मार्गस्थ होते.
खुडूस फाटा येथे माऊली वारीतील भव्य दिव्य सर्जनात्मक दुसरे गोल रिंगण सोहळा संपन्न होतो. विंझोरी , ज्ञानेश्वरनगर , धावाबावी माउंट अशी हरिजागर करीत वाटचाल सुरु होऊन वेळेतच वेळापूरी विसावते.
आयुष्यात वेळेला महत्त्व द्यावे. अध्यात्म , संस्कृती , भक्ती , प्रपंच , संतान , संस्कार , मातापिता , नातीगोती वेळच्या वेळी पाहणे. हेच वेळापूर माऊली.
आपलाच विठ्ठलमय प्रा. रवींद्र कोकरे.
९४ २१ २१ ६८ २१