दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
पुणे सोलापुर महामार्गावरली दौंड मळद तालुक्यातील तलावाच्या समोरील शेतात सतरा वर्ष मुलीचा गळा चिरुन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी आरोपी राहुल श्रीशैल निरजे
(वय-२७ वर्षे ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना मळद गावच्या हद्दीत मंगळवारी (दि.५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून सुदैवाने तरुणी बचावली.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पिरंगुट येथील मुळशी औद्योगिक वसाहतीतील कुकर हँडल कंपनीतील कामगार राहुल निरजे (वय-२७ वर्षे रा. पंचणर्वाडी,खटाव,ता.मिरज जि.सांगली) याने ससाणेनगर हडपसर येथील एका खाजगी शाळेत बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला दुचाकीवरुन (एमएच १० डीएस २७१०) पुणे सोलापूर महामार्गावरुन मळद येथे घेऊन गेला.
आरोपीने तरुणीला महामार्गालगत ऊसाच्या शेतात नेहून तिच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले.चेहरा व गळ्यावर वार झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली होती.तिला उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तरुणी सध्या ससाणेनगर हडपसर परिसरात राहत असून ती सोलापूर जिल्ह्यातील आहे.ही घटना नागरिकांनी लांब अंतरावरुन पाहिल्यानंतर त्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करुन पकडले.त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.