महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इन्स्ट्राग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवडल्या आहेत यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे.पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २ जुलै रोजी सकाळी साडे अकरा ते तीन जुलै रोजी सकाळी ११ या दरम्यान इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या पूजा गोस्वामी वय २१ रा पुणे या मुलीने फिर्यादी कमलेश स्वामी याला सातारा रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेतले. या दोघांची इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती.तिच्यासोबत च्या तीन अनोळखी युवकांनी फिर्यादीस ओमनी कार मध्ये बसून मुलीचा विनयभंग केला आहेस त्याबद्दल तक्रार करण्यासाठी पाच लाखाची खंडणी दे अशी धमकी दिली.
तसेच फिर्यादीला चाकूने धाक दाखवून त्याच बनावट पिस्टलने धमकी दिली व मोबाईलच्या पेटीएम अॅप मधून ६४ हजार रुपये ट्रान्सफर केले तसेच त्याच्या जवळ अडीच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेने या तक्रारीची नोंद करून घेतली होती सदर गुन्हा गंभीर स्वरूपात असल्याने स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धूमाळ आणि त्यांच्या पथकाने अतिशय पद्धतशीरपणे तपास सुरू केला यासाठी पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन गुन्ह्याची पद्धत समजावून घेतली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे रहिमतपूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन पुण्यातील आरोपींना ताब्यात घेतले गुन्ह्यात वापरलेला चाकू पिस्टल व सिगरेट सारखा दिसणारा लायटर जबरदस्तीने मोबाईल घेतलेला मोबाईल हँडसेट चार मोबाईल हँडसेट रोख रक्कम असा एकूण दोन लाख ५४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला खंडणी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा अवघ्या बारा तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. या तपासामध्ये उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस अंमलदार सतीश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले प्रवीण फडतरे विक्रम पिसाळ स्वप्निल माने स्वप्निल दौंड शिवाजी भिसे सचिन ससाणे पंडित निकम यांनीही कारवाई केली आहे.