वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वडगाव निबांळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपुल गावातून चोरीस गेलेल्या मोटारसायकली चोरणाऱ्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी ताब्यात असून, याप्रकरणी संशयित आरोपी किशोर हनुमंत माने,वय.२० वर्षे ( रा.तडवळे,ता.कोरेगाव,जि. सातारा ),शिवराज संतोष फाळके वय.१९ वर्षे ( रा.पावर हाऊस, सातारा रोड,ता.कोरेगाव,जि. सातारा ) अभिजित दीपक राऊत वय.२० वर्षे ( रा.आझादपूर,ता. कोरेगाव,जि.सातारा ) सुरज सुनील घमंडे,वय.२० वर्षे ( रा.सावंतवस्ती, वाघळवाडी,ता.बारामती,जि.पुणे ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत वडगाव निबाळकर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,करंजेपुल गावच्या हद्दीतील पल्सर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून, सातारा शहरांत दोघेजण गाडी फिरवित असताना, सातारा पोलिसांना मिळुन आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सोमेश्वर येथील मुलांकडून ही गाडी विकत घेतल्याचे सांगतिले,त्यावरून सातारा पोलीसांनी वडगाव निंबाळकर पोलीसांना सपर्क केला असता,
वडगाव पोलिसांनी सातारा येथे जात,संशयितांकडे चौकशी केली असता त्यानी बुलेट मोटार सायकलही घेतली असल्याचे सांगितले.
आणि ही बुलेट गाडी बारामतीमधील सुरज घमंडे व एका अल्पवयीन साथीदारांकडे चौकशी केली असता,त्यांनी बुलेट पल्सर गाडी चोरल्याचे कबुल केले.यातील बुलेट गाडी अंदाजे किंमत १ लाख ९० हजार व पल्सर मोटार सायकल अंदाजे किंमत १ लाख २५ हजार जप्त करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील चोरीची गाडी विकत घेणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्ह्यातील सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मिलिंद मोहीते,पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस नाईक नितिन बोराडे,पोलीस कर्मचारी महादेव साळुंके यांच्या पथकाने केलेली आहे.