मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED चे समन्स आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते पण ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलं नाही.या समन्समध्ये त्यांना ५ जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.
मनी लॉंडरिंग प्रकरणात त्यांना ईडीने समन्स बजावलं असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे,त्याचबरोबर त्यांच्यावर बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते.त्याच आरोपाखाली त्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.