मोठी बातमी ! अन् काही वेळातच शिवसेनेच्या या खासदारावरील कारवाई मागे ; शिवसेनेकडून सारवासारव सुरू..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय.पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.त्यावरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.दरम्यान, आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचं सत्र सुरू आहे.यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आली असून,एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आल्याचं सामनातून वृत्तानुसार बोललं जात होतं. दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *