Maharashtra State Wrestling : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना मोठा धक्का..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्रात सत्ता बदल झालेला असताना,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.हा शरद पवार यांना धक्का मानला जात आहे.महासंघाच्या सुचनांनुसार १५ आणि २३ वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही भारतीय कुस्ती संघटनेकडून बरखास्त करण्यात आली आहे.दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल अशी माहिती मिळत आहे.जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.भाजपचे खासदार बृजभुषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत.तर विनोद तोमर हे सचिव आहेत.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे ४० वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत.बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं.

भारतीय कुस्ती महासंघाकडं तक्रार देखील करण्यात आली होती.या बरखास्तीनंतर नव्यानं निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंग यांचे चांगले संबंध आहेत.तरी देखील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.दरम्यान,महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे विरोधात विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.   


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *