इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे याच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज १ जूलै २०२२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे.आज दुपारी २ वाजता भरणेवाडी ता.इंदापूर येथे अंत्यविधी होणार आहे. लहानपणापासून आजपर्यंत दत्तामामा भरणे यांच्या प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात पाठीशी असलेल्या आईचा आधार आज हरपला आहे.