पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केली आहेत.हेमंत उर्फ बबलु प्रताप धुमाळ,वय.२६ वर्षे (रा.सांगवी,ता.बारामती,जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.२९) स्वारगेट परिसरातील पुरंदर कॉम्प्लेक्स येथे केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की,स्वारगेट येथील पुरंदर कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या कॅनल जवळ एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून धुमाळ याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता ४० हजार २०० रुपयांचे एक पिस्टल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले.अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीवर पुणे ग्रामीण पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून,त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा व मोक्का या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहा.पोलीस निरीक्षक वैशाली भोसले,पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे,शंकर नेवसे,साधना ताम्हाणे,विजयकुमार पवार, गणेश थोरात,गजानन सोनुने,नागनाथ राख यांच्या पथकाने केली.