मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेट्वर्क…
सोशल मिडियावरून जनतेशी संवाद साधतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.राज्यात उद्याची बहुमत चाचणी होणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर महाआघाडी सरकार टिकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी औरंगाबादचे नामांतर करू शकलो
याबद्दल आपले आयुष्य सार्थकी लागले अशी भावना व्यक्त केली.याशिवाय अनेक महत्वाच्या सरकारी निर्णयांची त्यांनी माहिती दिली. खासदार शरद पवार आणि सोनिया गांधी यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.
बंडखोर आमदारांबद्दल खंत व्यक्त करताना ते म्हणाले की,ज्यांना शिवसेनेने मोठे केले, तेच नाराज झाले,मात्र शिवसेनेने अनेक आव्हाने पचवली आहेत, असेही ते म्हणाले आहेत.राज्यपाल महोदयांना मला धन्यवाद द्यायचे आहेत,की त्यांनी लोकशाहीचा मान राखत २४
तासांच्या आत बहुमत चाचणी घ्यायला सांगितली,असे सांगून श्री ठाकरे यांनी राज्यपाल आणि भाजपाला उपरोधिक टोला लगावला.