लोणंद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
अडीच दिवसाचा मुक्काम हा लोणंदमधील सर्वात मोठा पालखी सोहळ्यातील पर्वणी आहे. पिठलं , भाकरी , ठेचा यासह पुरणपोळी आमरस यांची रेलचेल असते. वारकरी विसाव्यातून आजूबाजूच्या दर्शनी स्थळांचा आनंद घेतात. तळावर भजन , कीर्तन , भारुड यासह निर्मलवारी , आरोग्यवारी यांची जनजागृती दिसून येते.
लोणंदकर सेवेकरी आनंदी राहून आनंद देतात. नैसर्गिक परिस्थितीत बिकट असताना सुद्धा सुखी ,समाधानी ,वृत्ती लोणंदकरांच्यात दिसून येते.वारीतील शिस्त दिसून येते. ऊनातान्हाची पर्वा न करता वारकरी समाधानी दिसून येतात. वायदेश , कोकणवासीय सामील होऊन जातात. वारकरी संख्या वाढत राहून उत्साह ओसांडून राहातो.
लोणंदचा अडीच दिवसाचा मुक्काम वारका-यातील प्रेम , स्नेहभाव ,बंधूता वाढीस लागते.
आपलाच आनंदवारकरी प्रा. रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१