पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार, गृहविभागाची अधिसूचना जारी..
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात सत्तासंघर्षाचं सावट असताना ठाकरे सरकारनं जनहिताची कामं सुरुचं ठेवली आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं.पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं.राज्याच्या पोलीस महासंचालकांना पोलीस भरती त्वरीत सुरु करावी,असे आदेश देण्यात आले आहेत,असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज्यात लवकरच पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविणार,जवळपास ७ हजार २३१ पदे भरली जाणार असून या प्रक्रियेसाठी पहिल्यांदाच शारीरिक चाचणी होणार असल्याचे गृह विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं. पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं.त्या नियमांमधील दुरुस्तीनंतर पोलीस भरती करण्याचा निर्णय गृहविभागानं घेतला आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिल्याचं म्हटलं. राज्यातील ७२३१ पदांची पोलीस भरती त्वरित सुरु होईल, असं वळसे पाटील म्हणाले.
पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण),१०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी.धावणे (५० गुण),१०० मीटर धावणे (२५गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १० गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR ( optical Mark Recognition ) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.