Baramati News : तुकोबारायांच्या वारीत घुसले,अन पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हेरले..अन अवघ्या काही वेळातच संशयितांनी भरली अख्खी बस..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामतीमध्ये देशमुख चौकात आलेल्या तुकोबारायांच्या वारीत चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या संशयितांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागाच्या विविध पथकांनी ताब्यात घेतले आहे. तुकोबारायांच्या वारीत आणि पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी बारामतीत आलेल्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

बारामतीत तुकोबारायांचा पालखी सोहळा पाटस चौकात पोहोचली असताना,पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी संशयितांवर नजर ठेवत सापळा रचून जी व्यक्ती संशयित दिसत आहेत,त्यांना ताब्यात घेतले.आणि बघता बघता या संशयितांनी अख्खी बस भरली.या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून पालखी सोहळा सुरक्षितरीत्या मार्गस्थ झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून,जर कोणी वारीत गालबोट लावणार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *