बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संविधान दिंडी” चे बारामती येथे आगमन झाले.वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणिव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा दृष्टीकोन आहे.
भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सप्तखंजीरी वादक व शाहीर , किर्तनकार तुषार सुर्यवंशी संविधानाची मुल्ये, तत्वे व संविधानातील अधिकार, कर्तव्ये तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाबाबत माहिती देत आहेत. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याच्याची माहिती देण्यात येत आहे.
वारकरी बांधव व नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे व बार्टी घडी पत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विषद करण्यात येत आहे. संविधान चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.संविधान दिंडीमध्ये बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर , विजय बेदरकर (अकोला), युनुस तडवी (जळगाव), रामदास लोखंडे, सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी, समतादूत प्रकल्प अधिकारी व समतादूत यांचा सहभाग आहे.