महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध अनुसूचित जातीच्या महिलेला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवत तसेच लग्नाचे आश्वासन देत वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बलात्कारासह अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांव्ये व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी २६ वर्षीय विधवा महिलेने फिर्याद दिली आहे.
दिल्लीतील उत्तम नगरमध्ये २६ जून रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.महिलेने तक्रारीत सांगितले की,२०२० मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.यानंतर त्यांनी या कामासाठी पीपी माधवन यांच्याशी संपर्क साधला.माधवनने महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.तक्रारीत म्हटले आहे की,२१ जानेवारी २०२२ रोजी माधवनने पहिल्यांदा घरी बोलावले होते.
त्यानंतर माधवनने महिलेला सांगितले की,तो त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे.यानंतर महिलेला माधवन अनेकदा भेटले.यादरम्यान अनेकवेळा महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे पीडितेने फिर्यादीत महंटले आहे.या महिलेचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग्ज लावण्याचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणाची चौकशी द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन हे करीत आहेत.