Baramati Political News : बारामतीत शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना सद्बुद्धी मिळण्यासाठी गणपतीला साकडं घालत केली महाआरती..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामतीत शिवसेना,युवासेना,कामगार सेना,महिला आघाडी,वाहतुकसेना,वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने बंडखोर आमदारांना सुबुद्धी यावी तसेच पक्षावर आलेले संकट दूर होण्यासाठी शिवसैनिकांनी आज गणपतीला साकडे घालत,महाआरती केली.यावेळी मात्र शिवसेनेच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करून आपल्या नेतृत्वावर असलेला विश्वास मात्र शिवसैनिकांकडून व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात अनेक घडामोडी घडत आहेत.त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असुन,शिवसेना पक्ष देखील चांगलाच अडचणीत आला आहे.आणि यामुळेच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत असुन,काही आमदारांची कार्यालये देखील शिवसैनिकांकडून फोडण्यात आलेली दिसुन येत आहेत. काही शहरात शिवसैनिक पक्षावरील संकट टळण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना फेसबुक लाईव्ह मार्फत भावनिक साद घातली होती. मात्र राज्याचं चित्र कायम आहे. याच सगळ्यात आता अनेक शहरात शिवसैनिक देवाला साकडं घालताना दिसत आहे.

यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख ॲड.राजेंद्र काळे, सहसंपर्क प्रमुख भीमराव भोसले,उपजिल्हाप्रमुख बाळासो शिंदे,तालुकाप्रमुख विश्वास मांढरे,शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने,क्षेत्रप्रमुख निलेश मदने,युवासेना तालुका प्रमुख निखिल देवकाते,शहर प्रमुख गणेश करंजे युवासेना तालुका प्रमुख दिग्विजय जगताप, शिवसेनेच्या महिला आघाडी संघटीका कल्पनाताई काटकर व शिवसैनिक उपस्थितीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *