Breaking News : उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता क्वारंटाईन झाले आहेत. अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्यानं ते क्वारंटाईन झाले आहेत. अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’ असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होतीा. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *