विधवा महिलांच्या हस्ते केले वृक्षारोपण..
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
समाजाला समतेचा संदेश देत अनोखे उपक्रम राबवित दिनांक २६ रोजी मौजे लासुर्णे येथील रूपनवर वस्ती येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची व राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करण्यात आली “या जयंती उत्सवाच्या निमित्ताने समाजाला समतेचा संदेश देत शाहूमहाराज यांच्या व अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन मुस्लिम समाजातील पतिपत्नी रज्जाक सय्यद व त्यांच्या पत्नी चाॅदबी सय्यद यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी समाजात कोणत्याही शुभ कामा पासून दूर राहिलेल्या उपेक्षित विधवा महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व नंतर भव्य असे रक्तदान शिबीर घेतले ज्यामध्ये जवळपास ६० युवकांनी रक्तदान केले यासाठी शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट चे सहकार्य लाभले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती शशीकांत तरंगे,गजानन वाकसे, नेताजी लोंढे, महेंद्र लोदाडे,संतोष लोंढे, सोमनाथ लोंढे, श्रिपती चव्हाण, सुरज वंसाळे,महेश लोंढे,रविराज भाळे,संजय वाघमाडे,संदेश लोंढे, पांडुरंग सुळ यांसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व युवा वर्ग उपस्थित होता.
संध्याकाळी सवाद्य भव्य अशी मिरवणूक निघणार आहे या साठी आयोजक महेश रुपनवर,दिपक रुपनवर,अनिल रुपनवर,प्रीतम रुपनवर, स्वप्निल रुपनवर,गणेश रुपनवर किरण रुपनवर,सुहास रुपनवर, कुलदिप वाघमाडे,गणेश वाघमोडे सुरेश वाघमोडे,दत्ता वाघमोडे सागर सुळ,नितीन डोंबाळे,वैभव महारनवर,अमर वाघमोडे,रवी दडस,नितीन जानकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.