Palakhi News : खासदार सुप्रिया सुळेंनी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी बनवलं पिठलं-भाकरी..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे या पालखी सोहळ्यात सामील झाल्या. त्यांनी दिवे घाटात काल फुगडी खेळली. आज पुन्हा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात यवत येथे सामील होत त्यांनी वारकऱ्यांची सेवा केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून यवत याठिकाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं-भाकरी करण्यात येते. आज या ठिकाणची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे या आल्या असता त्यांनीही महिलांसोबत चुलीवरची भाकरी आणि पिठलं बनवण्याचा आनंद घेतला.मात्र ही सेवा देताना त्यांनी भाजलेल्या भाकरीचा थेट संबंध महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे.

आज सासवडमध्ये माऊलीची पालखी मुक्कामी तर सोपानकाकांच्या पालखीचं होणार प्रस्थान.परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीनंतर आज दुपारी बारा वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून आज दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत.राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवार यांची नाराजी दूर करण्यात सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना सरकरमधला महत्त्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेताना दिसत आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *