महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
लोकांचा विश्वास संपादन करुन शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुकीतून दुपटीने नफा मिळवून देतो असे सांगत लोकांकडून पैसे घेणाऱ्या साखरवाडीच्या एकाला फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शेअर्स मार्केटच्या नावाखाली लोकांना दामदुप्पट नफा मिळवून देतो असे सांगत फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी पांडुरंग दत्तात्रय चव्हाण, वय.४१ वर्षे ( रा.साखरवाडी ता.फलटण ) याच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विक्रम जगन्नाथ भोसले ( रा.साखरवाडी,ता.फलटण ) यांनी २३ जुन रोजी तक्रार दाखल केली होती.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता आरोपीच्या खात्यामध्ये फिर्यादीने सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये रक्कम पाठवल्याचे लक्षात आले.तसेच आरोपीने गावातील आणखी दोघांना आणि दोन ऊसतोडणी कामगारांनाही गंडा घातल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आरोपीला २३ जुन रोजी रात्री साडे आठच्या सुमारास अटक करण्यात आली असून मा.कोर्टाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस दिलेली आहे.आरोपी आरोपीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा मुद्देमाल मिळाला नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे, म. पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत.
बातमी चौकट :
या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि दररोज घडणाऱ्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता लोकांनी शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान संपादन करुन, तसेच आपली संपत्ती संपादन करुन, तसेच आपली संपत्ती आणि गोपनीयता जपणाऱ्या विश्वासू माध्यमांतून गुंतवणूक करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक धोंगडे यांनी केले आहे.