डोंबिवली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
साईक्लिनिक या आयुर्वेदिक क्लिनिकच्या शटरचे लाॅक तोडून चोरी करणाऱ्यास टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १४,४३५ रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.अमनदिपसिंग बलबीरसिंग हुंजन असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी यांचे साईक्लिनिक नावाचे आयुर्वेदिक क्लिनिक आहे त्या दुकानाच्या शटरचा लाॅक तोडून औषधे,गोळ्या, आयुर्वेदिक पावडरच्या बाटल्या,क्रिम व वैद्यकीय साहित्य असा एकूण १४,४३५ रुपये किंमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला होता.त्याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून,या गुन्ह्यांचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असतांना मिळालेल्या सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे गुप्तबातमीदाराचे मार्फतीने सापळा रचुन संशयित आरोपी अमनदिपसिंग हुंजन यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने त्याचा साथीदार अझर याच्या सोबत सदरची घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले असुन पोलिसांनी त्याच्याकडून १४,४३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.दरम्यान,त्याच्या साथीदार याचा शोध सुरु आहे.