बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
हिमालया या आयुर्वेदिक प्रॉडक्ट असलेल्या कंपनीची डिस्ट्रीब्युशनशिप व डीलरशिप देण्याचे आमिष दाखवत, कंपनीच्या वेगवेगळ्या पदावर अधिकारी असल्याचे भासवत पाच जणांनी तब्बल ७ लाख ५४ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.हा प्रकार एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत घडला आहे.याबाबत संतोष गणपत रेणके,वय.४२ वर्षे, ( रा. आँरोवाले अपार्टमेंट,भिगवन रोड,कांचन नगर,बारामती ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.एवढे पैसे घेऊन देखील कंपनीची डिस्ट्रिब्युशनशिप व डीलरशिप न देता फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी विशाल पाटील,सुरेश त्रिपाटी,अविनाश शर्मा,संजीव नांगर,अजित जयस्वाल ( पूर्ण नाव,पत्ता माहीत नाही ) या पाच जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४१९,४२० प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर महितीनुसार, फिर्यादी रेणके हे इन्शुरन्स सर्वेअर म्हणून काम करीत असून,गेल्या वर्षभरापूर्वी फिर्यादींनी आपल्या फेसबुकवरून हिमालया या आयुर्वेदिक कंपनीला डीलर नेमायचे आहेत अशी जाहिरात पाहिली होती.त्यावेळी फिर्यादींना या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे वाटले असताना,त्यांनी १७ एप्रिल २०२१ रोजी या कंपनीशी संपर्क साधला असता, त्यावेळी फिर्यादींचे या कंपनीचे रिलेशनशिप मॅनेजर विशाल पाटील यांच्याशी बोलणे झाले असता,कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी दुकानाचा पूर्ण सेट अप आणि दुकानाची रचना व कंपनीमार्फत लोकल मार्केटिंग स्टाफ हा कंपनीमार्फत दिला जातो. आणि डीलरशिपसाठी कंपनीचे सर्व प्रॉडक्ट खरेदी करावी लागतात.
यासाठी तुम्हाला दोन लाख भरावे लागतील असे पाटील यांनी फिर्यादींना सांगितले.तसेच दोन लाख भरल्यानंतर कंपनी तुम्हाला चार लाखांचा माल देईल.त्यानंतर फिर्यादींनी त्यांच्या मेल आयडीवर आलेला हिमालया कंपनीचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला.यानंतर वेळोवेळी कंपनीचे डिस्ट्रीब्युशन मॅनेजर सुरेश त्रिपाठी,एचआर डिपार्टमेंट मधून अविनाश शर्मा,टीम लीडर अजित जयस्वाल अशी नावे सांगत वारंवार फिर्यादींकडून डिस्ट्रीब्यूशनशिप व डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल ७ लाख ५४ हजार मागवून घेत डीलरशिप न देता आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादीने डीलरशिप मिळवण्यासाठी संपर्क केला असता,त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. व त्यानंतर सर्वांचे मोबाईल नंबर बंद लागू लागल्याने फिर्यादींच्या लक्षात आले की,आपल्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला असून,फिर्यादींनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या गुन्ह्याचा अधिक तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ हे अधिक तपास करीत आहेत.