Baramati News : सातव्या आंतरराष्ट्रीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धेत बारामतीच्या छायाचित्रकाराने पटकावले प्रथम पारितोषिक..!!


बारामतीत क्षेत्रात आढळणाऱ्या दुर्मिळ लांडग्यांच्या छायाचित्रास द्वितीय क्रमांक…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील हुरहुन्नरी छायाचित्रकार प्रवीण जनार्दन जगताप (रा.पणदरे,ता.बारामती, जि.पुणे) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील झालेल्या सातव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून,बारामती परिसरात आढळणाऱ्या दुर्मिळ लांडग्याच्या त्याच्या पिल्लासह टिपलेल्या छायाचित्रास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

बारामतीसह आसपासच्या परिसरातील डोंगराळ भागात व माळरानावर ह्या लांडग्याची प्रजात आढळून येते.पूर्वी लांडगा फक्त शिकार करत परंतु अलिकडच्या काळात पोल्ट्री मधील टाकून दिलेल्या कोंबड्यावर त्यांची गुजराण होत आहे.प्रवीण जगताप यांनी काही वर्षांपूर्वी फोटोग्राफी सुरु केली. वन्यजीव फोटोग्राफीसाठी त्यांनी ताडोबा,नागझिरा,पेंच,कान्हा, बांधवगड यासह हिमायलायातील किब्बर,सत्ताल अशा अनेक ठिकाणी अनेक वर्षे भटकंती केली.या दरम्यान त्यांनी लांडगे, कोल्हे,तरस अशा प्राण्यांचे फोटो काढले.

त्यांच्या या छायाचित्रापैकी लांडग्याच्या पिल्लासोबतच्या फोटोला जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.१७४ देशातील जवळपास १,२४,८२७ छायाचित्रकारांनी यात भाग घेतला.यात ४ लाख ७० हजार फोटो आले होते.वाईल्ड फोटोग्राफीमध्ये बेस्ट फोटो आणि टॅाप फोटोग्राफर म्हणुन या दोन्ही मध्ये दुसरा क्रमांक आला.ही स्पर्धा जगातील फोटोग्राफी क्षेत्रातील ही सर्वात मोठी स्पर्धा असते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *