Palakhi News : विद्येच्या माहेर घरी पालखी सोहळ्याचे आगमन..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

देहू आळंदी पावनभूमीतून संत तुकाराम व ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा प्रस्थान करुन मार्गस्थ. लाखो वारक-यांच्या उपस्थितीत हा वैष्णव सोहळा एकता , समता , भक्ती , शक्ती यांची भगवी पताका खांद्यावर घेऊन भागवत संप्रदाय अखंडित सुरु आहे. वारी मंजे चैतन्य व ऊर्जा यांचा सोहळा आहे.

देहू आळंदीतून ज्ञानाचा आरंभ करुन ओवी अन् अभंग यांचे संशोधन करणे. नवनिर्मीती व सृजनशीलता वाढीस लावणे. वारी मंजे आनंदवारी यासह शिकणे , शिकवणे यांचा अनुपम्य सोहळा होय. सात्त्विकता वाढीस लागते. तमोगुणाचा निचरा. मनुष्य त्व अंगीकारता येतं. नैसर्गिक दर्शन , भौगोलिक रचना , बोलीचा तडाका , विविध आंगी , रंगी मनुष्य दर्शन . विविधतेतून एकता दर्शन हीच खरी वारी.

आज विद्येच माहेरघर पुण्यनगरीत भव्य दिव्य आगमन . पुण्यात वारीच्या काळात ज्ञाना सह आचरण ध्यानात येतं. शहरी अन् ग्रामीण संस्कृतीचा समन्वय दिसून येतो.पुणं तिथं काय उणं. याची प्रचिती येते.

ज्ञानोबा तुकोबा या द्वयचा अनुभव व अनुभूती आज पुण्यात घेऊ. माऊली संगे पंढरीची वारी.

आपलाच वारकरी प्रा. रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *