Tahsildar Acb Trap : काळ्या कमाईचे काळे परिणाम..कळंबच्या तत्कालीन तहसीलदार यांनी जमवली लाखोंची बेहिशोबी मालमत्ता.. तब्बल सहा वर्षांनी झाली अटक..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कळंब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना वैशाली नामगोंडा पाटील हिने अवैध मार्गाचा अवलंब करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. त्या अनुषंगाने एसीबीने पाटील हिने मार्च २००८ ते ३० जून २०१६ या काळात अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी केली.त्यात तिने सर्व ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत २२ लाख ४ हजार ३३७ रुपये म्हणजेच २९ टक्के अधिक काली कामे केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तिच्याविरोधात कळंब पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला तहसीलदार यांना अटक करण्यात आलेली आहे.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.कळंब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना वैशाली नामगोंडा यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असतांना त्यांची गंगापूरच्या जामगाव येथील महाराष्ट्र शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक म्हणून बदली झाली होती.

लाचलूचपत विभागाच्या चौकशीत वैशाली यांनी २००८ ते २०१६ या काळात अवैध मार्गाने २२ लाखांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले होते. उस्मानाबादच्या एसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी गंगापूर पोलिस तसेच महाराष्ट्र शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने यांनाही या कारवाई संदर्भात पत्र पाठवून माहिती दिली.पोलिसांच्या पथकाने गंगापूर शहरातील लासूर रोडवरील राहत्या घरातून नामगोंडा पाटील यांना अटक केली.अटकेनंतर एसीबीचे पथक नामगोंडा पाटील यांना कळंब येथे घेऊन गेले.न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या, ता.२० सोमवारी होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *