Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ? मेहबूब शेख प्रकरणात बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावल्याचा पीडितेचा खळबळजनक दावा..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली असून, एका लैंगिक अत्याचार पीडितेने चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची तक्रार द्यायला लावल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने आता वेगळ वळणं घेतलं आहे.चित्रा वाघ यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत.आत्ता पुन्हा असेच आरोप झाल्याने ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक आरोप प्रकरणात असेच आरोप पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले होते. तेव्हाही बराच राजकीय वादंग झाला होता. आत्ताही या आरोपांनंतर पुन्हा नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.याप्रकरणात चित्रा वाघ यांनीच नाहीतर भाजप आमदार सुरेध धस यांचाही सहभाग असल्याचा आरोप या पीडितेकडून करण्यात आला आहे.तशी तक्रार पीडितेने दाखल केली आहे.त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्यासोबतच सुरेश धस यांच्याही अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.हे सर्व सुरेश धस यांच्या सागण्यावरून झालं आहे, अशी तक्रार आता पीडितेने दिली आहे. नदमोद्दीन शेख नावाच्या वक्तीला धस यांनी मेहबूब शेख यांना एखाद्या प्रकरणात अडकवं असे सांगितले होते.

त्यानंतर नदमोद्दीन शेख याने मला लग्नाचे अमिष दाखवू माझ्यावर अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मला खोटी तक्रार द्यायला लावली. तर त्यानंतर या नदमोद्दीन शेख यानेच पीडितेला चित्रा वाघ यांच्याकडे नेले. त्यावेळी आता जर तु तक्रार मागे घेतली तर तुझ्याच अडचणी वाढतील.तुलाच पोलीस अटक करतील,असे चित्रा वाघ यांनी धमकावल्याचे तरुणीने आपल्या आरोपात महंटले आहे.याप्रकरणी आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे.

राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पीडितेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केली आहे, हे आताचं माध्यमातून कळल ज्या केसेसमध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे.आम्ही त्या मुलीला मदत केली आहे. आम्ही चौकशीला जायला तयार आहे. असे अनुभव येत असतात तरीही आम्ही घाबरणार नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *