भव्य राजवाड्याची प्रतिकृती व त्यावरील लाईट इफेक्ट ठरला आकर्षणाचा विषय…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जंयतीचे औचित्य साधत,अहिल्यादेवी चौक सिनेमा रोड येथील राष्ट्रमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीच्या भव्य दिव्य परंपरेला साजेसा यावर्षीही भव्य राजवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली असून,त्यावर लाईट इफेक्ट करण्यात आल्याने ही प्रतिकृती आकर्षणाचा विषय ठरली आहे.रात्रीच्या वेळी अहिल्यादेवींची मूर्ती नेत्रदीपक दिसत असुन,अनेकांचे लक्ष वेधुन घेत होती.सकाळी सिध्देश्वर,काशिविश्वेवर, रामेश्वर,पांढरेश्वर या मंदिरात अभिषेक व पुजा करण्यात आली.
तसेच सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या मूर्तीचे पुजन मा.जिल्हा परिषद अध्यक्ष नाना देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तात्रय येळे सर, सचिन सातव,मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर,हरिभाऊ काळे,दिग्विजय तुपे,दिलीप शिदे, संदिप देशपांडे,संदिप चोपडे,निलेश इंगुले या मान्यवरांच्या हस्ते पुजन व आरती झाली.दुपारी आलेल्या मिरवणूकीचे स्वागत १ टन भंडारा व आतिषबाजी करून करण्यात आली.
यावेळी धर्मरक्षक प्रतिष्ठान व श्री शिवसूर्य शस्त्र विद्या सवध॔न यांच्या वतीने लाठीकाठी तलवारबाजी,दांडपट्टा यांसारख्या साहसी खेळाचे प्रात्यक्षीक सादर करून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना दिली व मुतीस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश धालपे व सागर जाधव पितांबर सुभेदार यांनी हार आप॔ण केला तसेच रविवारी दि.१९ रोजी वृक्षरोपण व रक्तदान शिबिराचे करण्यात येणार आहे.सोमवारी २० रोजी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडणार असून,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश धालपे,अशिष घोरपडे,अश्विन भोकरे, आनंद खुळपे,अनिकेत धालपे,चेतन वाडेकर,अक्षय नवले,रोहित पिसे यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.