Anti Corruption Bureau : पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना नेमके झाले तरी काय ? सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन लाखांची मागणी करताना ACB च्या जाळ्यात..!!


पुणे ग्रामीण हद्दीत होणाऱ्या ACB च्या कारवायाबाबत कार्यक्षम पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आत्मचिंतन करणार का ? अशा अधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेणार ?

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

गेल्या वर्षभरात पुणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या कारवायांचे प्रमाण वाढले असून यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे यामुळे आता पुणे ग्रामीणचे कार्यक्षम पोलीस अधीक्षक अशा अधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेणार ? जेणेकरून पुणे ग्रामीण पोलीस दलात होणारा भ्रष्टाचार थांबण्यास मदत होईल यामुळे आता अभिनव देशमुख या कारवायाबाबत आत्मचिंतन करणार का ? अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

रांजणगाव येथील एका कंपनीकडे लेबर क्रॉन्ट्रक्ट
असून या क्रॉन्ट्रक्टप्रमाणे या कंपनीकडे असणारी थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हिरामण कारंडे याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे हे पुणे ग्रामीण पोलीस दलातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.याबाबत ३० वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.पथकाने ८ जून रोजी पडताळणी करुन गुरुवारी(दि.१६) गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यांचे रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीकडे लेबर क्रॉन्ट्रक्ट
असून या क्रॉन्ट्रक्टप्रमाणे कंपनीकडे असणारी थकीत मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध कारवाई न करण्यासाठी देविदास कारंडे यांनी दोन लाख रुपये लाच मागितली.

मात्र,तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता,सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास कारंडे यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने हे करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *