मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
२०.७९ कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा ५.१२कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीड,( वय.३६ वर्षे ) यांना बुधवार अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण –अ,मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त निळकंठ घोगरे,सहायक राज्यकर आयुक्त योगेश मनाळ,संतोष कुमार राजपूत सहभागी झाले होते. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी २० जणांना अटक केली आहे.